Subscribe Us

यंदाचं वर्ष तेरा महिन्यांचं ; कसं ते जाणून घेऊया

 यंदाचं वर्ष तेरा महिन्यांचं ; कसं ते जाणून घेऊया !

वर्षात तेरावा महिना म्हणजे अधिकाचा महिना. हा अधिकचा महिना येतो तेव्हा ओढाताण होते. यावरूनच `दुष्काळात तेरावा महिना` अशी म्हण पडली.


Adhik Maas / Puroshottam ) २०२३: नवीन वर्ष सुरू होण्यासाठी  फारसे दिवस नाहीत . ज्योतिष्यांच्या मते, २०२३ हे वर्ष फार सूंदर असणार आहे. हिंदू पंचांगानुसार, येणारं नविन वर्ष १२ महिने नाही तर १३ महिन्यांचं आहे. या वर्षात महादेवाचा श्रावण महिना (Shravan month) एक नाही तर दोन महिने आहे. तसेच वर्षातून एक दोन वेळा जे मिळेल त्यावरच पुढील बारा महिने गुजराण करावी लागत असे. अशा काळात ज्या वर्षात तेरावा महिना म्हणजे अधिकचा महिना येई तेंव्हा ओढाताण व्हायची. यावरूनच 'दुष्काळात तेरावा महिना' अशी म्हण पडली. 

अधिक मासामुळे (adhik mas) हे घडणार असून याला मलमास असेही म्हणतात. भविष्यकार मते, अधिकमास असल्यामुळे यंदा १९ वर्षानंतर श्रावण महिना तब्बल दोन महिने आहे.


अधिक मास कधीपासून कधी पर्यंत असेल ?

२०२३ मध्ये अधिकमास १८ जुलैपासून सुरु होणार आहे आणि १६ ऑगस्ट २०२३ पर्यंत राहील. या महिन्याला श्री भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना संबोधलं जातं. अधिक महिना श्रावण महिन्यातच सुरू होणार असल्याने महादेवाची भक्ती करणाऱ्यांना अधिक वेळ मिळणार आहे.


मलमास म्हणजे काय ?

हिंदू (Hindu calender) कॅलेंडरनुसार हरएक तीन वर्षांनी एक महिना जास्त जुळून येतो ज्याला आपण "अधिकमास किंवा मलमास" किंवा "पुरुषोत्तम" म्हणतो. सूर्य वर्ष ६५ दिवस आणि ६ तास असते. तर चंद्र वर्ष ३५४ दिवसांचं मानल्या जातं. दोन्ही वर्षांमध्ये जवळपास ११ दिवसांचा फरक तयार होतो. प्रत्येक वर्षी कमी होणाऱ्या या ११ दिवसांना जोडल्यास एक महिना होतो. याच अंतराला सुरळीत करण्यासाठी दर तीन वर्षांनी चंद्र मास अस्तित्वात येते. ज्याला अधिकमास असं म्हणतात.


या चुका विसरून पण करू नका अधिकमासात


१.
लग्न ( Marriage )- पुरुषोत्त मासात लग्न करणं अशुभ मानल जातं. या महिन्यात लग्न केल्यास ना तुम्हाला भौतिक सुख मिळणार ना तुम्हाला शारीरिक सुख मिळणार. पती व पत्नीत भांडणं जास्त होतात.


२.नव्या दुकानाचं काम ( New Store Opening ) - पुरुषोत्तम मासात नविन व्यवसाय सुरू करू नका. मलमासात नवा व्यवसाय सुरू केल्यास तुम्हाला अनेक आर्थिक अडचणीना  सामना करावा लागू शकतो.


३. इमारतीचे बांधकाम  - अधिकमासात नविन घराचे बांधकाम करू नये. या महिन्यात बांधलेल्या घरांत सुख शांतीचा भंग होतो.


४.शुभ कार्य करू नये ( Don't Start New Work ) - कोणतेही मंगल कार्य जस की कर्णवेध, मुंडन अशुभ मानल जातं. या महिन्यात इमारतीचे किंवा कुठलेही काम केल्यास नात्यातला गोडवा कमी होऊ शकतो असे म्हणतात. 


अधिक महिना म्हणून साधारणतः श्रावण, ज्येष्ठ आणि आषाढ हे महिने बहुतांशदा येत असतात. एकदा एखादा महिना अधिक आला की पुन्हा १९ वर्षांनी तो महिना अधिक होतो असे सर्वसामान्यपणे आढळते. परंतु श्रावण आणि ज्येष्ठ महिन्यांच्या बाबतीत ही वेळ ११ वर्षांनी व त्यानंतर लगेच ८ वर्षांनीही येऊ शकते. १९८० नंतर लगेच १९८८ साली ज्येष्ठ महिना अधिक आला होता. त्यानंतर ११ वर्षांनी १९९९ साली तो पुन्हा अधिक महिना म्हणून आला. तेव्हापासून एक आड एक आठ आणि अकरा वर्षांनी अधिक होण्याचा मान त्याला मिळत आहे. हा क्रम २०४५ पर्यंत चालू राहील. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या